कुणी येणार गं मुंबई पुणे मुंबई ३ - देवयानी कर्वे - कोठारी, पल्लवी राजवाडे
होणार गं
कुणी येणार गं
आजी तू आबा मी
होणार गं
कुणी येणार गं
नवखी चाहूल
इवलं पाऊल
रुजलेला अंकुर आता
फुलणार गं
कुणी येणार गं
मायेचा सोहळा
झुलवू झोपाळा
फुलांच्या माळांनी घर हे कसे
खुलणार गं
कुणी येणार गं
चिऊची ताई नि काऊ चा दादा
चांदोमामा अन काळोख बुवा
पणजीचा मान
होऊन बेभान
बाळाचे खुप लाड मी
करणार गं
कुणी येणार गं
चाउ आणि माऊ चे खेळ आपण खेळू
पितळीचे पाणी तुला
बियर आम्ही पिऊ बेटा बियर आम्ही पिऊ
इवलुशा भातुकलीत भांडी कुंडी खेळू
छोट्याश्या कपातला चाहा आम्ही पिऊ
भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या
फुले आणि उंच उडणाऱ्या पऱ्या
उमलून आले
आईचे तेज
मायेची सेज साजिरी
सजणार गं
कुणी येणार गं
Music - Nilesh Moharir
Lyrics - Devayani Karve-Kothari, Pallavi Rajwade
Singer - Hrishikesh Ranade, Aanandi Joshi, Saee Tembhekar, Jaydeep Bagwadkar, Varsha Bhave, Yogita Godbole, Mandar Apte
Movie - Mumbai Pune Mumbai 3
Director - Satish Rajwade
Tag :- Mumbai Pune Mumbai 3 Songs Lyrics, Swapnil Joshi Songs Lyrics, Mukta Barve Lyrics, Maharudra Doiphode Lyrics, Devyani Karve Kothari Lyrics, Pallavi Rajwade Lyrics
Tag :- Mumbai Pune Mumbai 3 Songs Lyrics, Swapnil Joshi Songs Lyrics, Mukta Barve Lyrics, Maharudra Doiphode Lyrics, Devyani Karve Kothari Lyrics, Pallavi Rajwade Lyrics
0 Comments