मनाच्या धुंदीत, लहरीत ये ना - शांता शेळके
मनाच्या धुंदीत, लहरीत ये ना
सखे ग साजणी ! ये ना !
सखे ग साजणी ! ये ना !
जराशी सोडून जनरीत ये ना
सखे ग साजणी ! ये ना !
चांदणं रुपाचं आलंय भरा
मुखडा तुझा ग अती साजरा
माया शिवारी ये तू जरा
चारा घालीन तुज पाखरा
मुखडा तुझा ग अती साजरा
माया शिवारी ये तू जरा
चारा घालीन तुज पाखरा
माझे डोळे शिणले ग,
तुझी वाट पाहुनी, ग ये
गुलाबी गालांत हासत ये ना
सखे ग साजणी ! ये ना !
तुझी वाट पाहुनी, ग ये
गुलाबी गालांत हासत ये ना
सखे ग साजणी ! ये ना !
जराशी लाजत मुरकत ये ना
सखे ग साजणी ! ये ना !
सखे ग साजणी ! ये ना !
आता कुठवर धीर मी धरु ?
काळिज करतंय बघ हुरहुरू
सजणे नको ग मागे फिरू
माझ्या सुरांत सुर ये भरु
काळिज करतंय बघ हुरहुरू
सजणे नको ग मागे फिरू
माझ्या सुरांत सुर ये भरु
माझे डोळे शिणले ग,
तुझी वाट पाहुनी, ग ये
बसंती वाऱ्यात, तोऱ्यात ये ना
सखे ग साजणी ! ये ना !
तुझी वाट पाहुनी, ग ये
बसंती वाऱ्यात, तोऱ्यात ये ना
सखे ग साजणी ! ये ना !
सुखाची उधळीत बरसात ये ना
सखे ग साजणी ! ये ना !
सखे ग साजणी ! ये ना !
" Manachya Dhundit Laharit Ye Na Shanta Shelke "
" Shanta Shelke Songs "
" Marathi Juni Gani "
" Old Marathi Songs "
0 Comments