मला जाऊद्याना घरी आता वाजले की बारा - गुरु ठाकूर
चैत पुनवेची रात आज आलिया भरात
धडधड काळजात माझ्या माईना
कदी कवा कुठं कसा जीव झाला येडापिसा
त्याचा न्हाई भरवसा तोल ऱ्हाईना
राखली क मर्जी तुमच्या जोडीनं मी आले
पिरतीच्या या रंगी राया चिंब ओली मी झाले
राया सोडा आता तरी काळयेळ न्हाई बरी
पुन्हा भेटु कवातरी साजणा
मला जाऊद्याना घरी, आता वाजले की बारा
कशा पाई छळता, मागं मागं फिरता
असं काय करता, दाजी हिला भेटा की येत्या बाजारी
सहाची बि गाडी गेली नवाची बि गेली
आता बाराची गाडी निघाली
हिला जाऊद्याना घरी, आता वाजले की बारा
ऐण्यावाणी रुप माझं उभी ज्वानीच्या मी उंबऱ्यात
नादावलं खुळंपिसं कबुतर ह माझ्या उरात
भवताली भय घाली रात मोकाट ही चांदण्याची
उगा घाई कशापायी हाये नजर उभ्या गावाची
शेत आलं राखनीला राघु झालं गोळा
शीळ घाली आडुन कोनी करून तिरपा डोळा
आता कसं किती झाकू सांगा कुटवर राखू
राया भान माझं मला ऱ्हाईना
मला जाऊद्याना घरी, आता वाजले की बारा
कशा पाई छळता, मागं मागं फिरता
असं काय करता, दाजी हिला भेटा की येत्या बाजारी
सहाची बि गाडी गेली नवाची बि गेली
आता बाराची गाडी निघाली
हिला जाऊद्याना घरी, आता वाजले की बारा
आला पाड झाला भार भरली उभारी घाटाघाटात
तंग चोळी अंग जाळी टच्च डाळिंब फुटं व्हटात
गार वारा झोंबणारा द्वाड पदर जागी ठरंना
आडोश्याच्या खोडीचं मी कसं गुपीत राखू कळंना
मोरावानी डौल माझा मैनेवानी तोरा
औंदाच्या गा वरसाला मी गाठलं वय सोळा
जीवा लागलीया गोडी तरी कळ काढा थोडी
घडी आत्ताची ही तुम्ही ऱ्हाऊ द्या
मला जाऊद्याना घरी, आता वाजले की बारा
कशा पाई छळता, मागं मागं फिरता
असं काय करता, दाजी हिला भेटा की येत्या बाजारी
सहाची बि गाडी गेली नवाची बि गेली
आता बाराची गाडी निघाली
हिला जाऊद्याना घरी, आता वाजले की बारा
" Wajle Ki Bara Lyrics "
" Mala Jaudyana Ghari Aata Wajle Ki Bara Natarang Marathi Movie Song Lyrics "
" Guru Thakur Marathi Songs "
" Marathi Lavni Songs "

0 Comments