मागू कुणा हात रं - Magu Kuna Haat Ra Mauli Lyrics Ajay Atul

मागू कुणा हात रं - अजय अतुल

जगणं झालंय लाचार
आभाळ रं फाटलं
मिटलं आता तुझं दार
मागू कुणा हात रं
धिर खचला, वाट चुकली
घाव पडला, आस टिचली
परतून येशील का सांग
समदाच अंधारलं

जगणं झालंय लाचार
आभाळ रं फाटलं
मिटलं आता तुझं दार
मागू कुणा हात रं

धुमसना ठिणगी रं
ईझला तो वदरा
सुख नाही सिलकी ला
भोवताली चकवा

वैरी काटा पायात रुतला
आशा काळीज चिरतंय
झाल्या वाटा साऱ्याच फसव्या
मळा राखेत झुरतय
रंग इरला, हाक हुकली
नाळ करवी, नाही तुटली
परतून येशील का सांग
समदच अंधारलं

जगणं झालंय लाचार
आभाळ रं फाटलं
मिटलं आता तुझं दार
मागू कुणा हात रं

सुटलेल्या वळणाला
परतीचा रुजवा
गुतलेल्या नियतीचा
छळतोया रुसवा
नाही कैवार घेण्या कुणी रं
जाळी अंगार धगती
राही हातात झुरणं नुसतं
डोळे दाटून झरती
साथ सरली, याद उरली
वाऱ्यावरती साद विरली
परतून येशील का सांग
समदच अंधारलं

जगणं झालंय लाचार
आभाळ रं फाटलं
मिटलं आता तुझं दार
मागू कुणा हात रं


Lyrics - Guru Thakur
Movie - Mauli (2018)
Music - Ajay Atul
Singer - Ajay Gogavale




Mauli Marathi Movie 2018 Full Songs Lyrics,
Ajay Atul Songs Lyrics,
Rites Deshmukh Marathi Movie Songs Lyrics,
Guru Thakur Songs Lyrics,

मागू कुणा हात रं गीत



Reactions

Post a Comment

0 Comments