जेव्हा तुझ्या बटांना - Jevha Tujhya Batanna Marathi Song Lyrics

जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा - मंगेश पाडगावकर


जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा

आभाळ भाळ होते, होती बटाही पक्षी
ओढून जीव घेते पदरावरील नक्षी 
लाटांस अंतरीच्या नाही मुळी निवारा

डोळे मिटून घेतो, छळ हा तरी चुकेना
ही वेल चांदयाची ओठांवरी झुकेना
दशील का कधी तू थोडा तरी इशारा ? 

नशी बास हा फुलांचा का सांग वास येतो
हासून पाहिल्याचा नुसताच भास होतो
केहा तुझ्या खुशीचा उगवेल सांग तारा?




" Jevha Tujhya Batanna Udhali Mujor Vara - Mangesh Padgaonkar "


Lyrics - Mangesh Padgaonkar

Singer - Suresh Wadkar
Reactions

Post a Comment

0 Comments