भेट तुझी माझी स्मरते
भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
कुठे दिवा नव्हता, गगनी एकही न तारा
आंधळ्या तमातुन वाहे आंधळाच वारा
तुला मुळी नव्हती बाधा भीतीच्या विषाची
क्षुद्र लौककाची खोटी झुगारुन नीती
नावगाव टाकुन आली अशी तुझी प्रीती
तुला मुळी जाणीव नव्हती तुझ्या साहसाची
केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली
श्वासांनी लिहली गाथा प्रितीच्या रसाची
सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास
सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची
- Mangesh Padgaonkar
" भेट तुझी माझी स्मरते मंगेश पाडगावकर "
" भेट तुझी माझी स्मरते लीरिक्स "
" Bhet Tujhi Majhi Smarate Song Lyrics "
0 Comments