हृदयी वसंत फुलताना - Hrudayi Vasant Phultana Lyrics

हृदयी वसंत फुलताना लीरिक्स


हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे

मोहूनिया ऐसी जाऊ नको
रोखुनिया मजला पाहू नको
गाणे अमोल प्रीतीचे अधरातुनी जुळावे

हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे

पाकळी पाकळी उमले प्रीत भरलेली
अवघी अवनी सजली, धुंद मोहरली
उसळून यौवनाचे या नयनात रंग यावे
सौख्यात प्रेमबंधाच्या हे अंतरंग न्हावे
हळवे तरंग बहराचे अंतरी फुलावे

हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे

मदभरा प्रीतीचा गंध हा देग मधुवंती
रंग तू सोड रे छंद हा, तू ना मजसाठी
हा खेळ ऐन ज्वानीचा लाखांत देखणासा
हे तीर चार नयनांचे देती आम्हा दिलासा
जखमांत मदनबाणांच्या मन दरवळून जावे

हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे






" अशी ही बनवाबनवी गाणी "
" Ashi Hi Banwabanwi Songs Lyrics "
" Arun Paudwad Songs "
" Laxmikant Berde Songs "
" Ashok Sharaf Songs "
" Romantic Marathi Songs Lyrics "
" Old Marathi Songs Lyrics "
" Hrudyai Vasant Phultana Lyrics "


Reactions

Post a Comment

0 Comments