बगळ्यांची माळ फुले/ Bagalyanchi Maal Phule Lyrics

बगळ्यांची माळ फुले - वा रा कांत


बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात
भेट आपुली स्मरशी काय तू मनात ?

छेडिती पानांत बीन थेंब पावसाचे
ओल्या रानात खुले ऊन अभ्रकाचे
मनकवडा घन घुमतो दूर डोंगरात

त्या गाठी, त्या गोष्टी, नारळीच्या खाली
पौर्णिमाच तव नयनी भर दिवसा झाली
रिमझिमते अमृत ते विकल अंतरात

हातांसह सोन्याची सांज गुंफताना
बगळ्यांचे शुभ्र कळे मिळुनी मोजताना
कमळापरी मिटती दिवस उमलुनी तळ्यात

तू गेलीस तोडूनी ती माळ, सर्व धागे
फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे
सलते ती तडफड का कधी तुझ्या उरात ?

                                  - वा. रा. कांत



" Bagalyanchi Mal Phule Ajuni Ambarat Lyrics "
" Bagalyanchi Maal Phule Song Lyrics "
" बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात गीत "
" बगळ्यांची माळ फुले लीरिक्स " 
" Old Marathi Song Lyrics, जुनी मराठी गाणी "

Reactions

Post a Comment

0 Comments